+919404395976
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
सोनोग्राफीबाबत असणा-या प्रश्न व चुकीच्या समज-गैरसमजांची उत्तरे! गर्भधारणा म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी आणि परिवारासाठी आनंदाची गोष्ट असते. गर्भधारणा हा शब्द ऐकला म्हणजे चाहूल लागते ती लहान बाळाच्या पावलांची आणि त्याच्यासोबतच येणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांची. सोनोग्राफी हा गर्भधारणा व प्रसुती प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, या सोनोग्राफीबद्दल गर्भवती महिला आणि तिच्या परिवारातील सदस्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. एकूण किती सोनोग्राफी कराव्यात, त्या सोनोग्राफीत नेमके काय दिसते आणि त्याचे काही दुष्परिणाम तर होणार नाही ना, याच प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण प्रस्तुत लेखातून करणार आहोत. गर्भधारणेपासून प्रसुतीपर्यंत विविध टप्प्यांवर डॉक्टर सोनोग्राफी करण्याचा सल्ला देतात. त्यापैकी आपण कन्फर्मेशन स्कॅन, अॅन्टीस्कॅन, अनॉमली स्कॅन आणि शेवटचा स्कॅन म्हणजे ग्रोथ स्कॅन व डॉपलर या मुख्य स्कॅनबद्दल जाणून घेणार आहोत. कन्फर्मेशन स्कॅन गर्भधारणा निश्चित झाली की, पहिली सोनोग्राफी म्हणजे कन्फर्मेशन स्कॅन होय. या सोनोग्राफीद्वारे सर्वप्रथम आपण हे बघतो की, गर्भधारणा नेमकी गर्भाशयातच झाली आहे ना...! जर गर्भधारणा गर्भाशयाच्या आत न होता, अन्यत्र कुठे झाली असेल तर ती गर्भधारणा ठेवता येऊ शकत नाही. बाळ एक आहे की, जुळे वा तिळे आहे, हे आपण या स्कॅनद्वारे बघतो. फिटल पोल आलयं का? त्यात हृदयाचे ठोके आहेत का? रक्तपिशवीत कुठे रक्ताची गाठ तर नाहीय ना? हे या स्कॅनद्वारे तपासले जाते. गर्भाशयाचे तोंड उघडे आहे की बंद हे देखील या स्कॅनद्वारे तपासण्यात येते. जर ते उघडे असेल तर बाळ आपोआप पडण्याचा धोका असतो. गर्भाशयात बाळ किती आठवड्याचे झाले आहे, हे या स्कॅनवरून कळते. अॅन्टीस्कॅन गर्भधारणेनंतर साधारणतः अकरा ते चौदा आठवड्यात करण्यात येणाऱ्या सोनोग्राफीला अॅन्टीस्कॅन असे म्हणतात. या सोनोग्राफीत तीन बाबी प्रामुख्याने तपासल्या जातात. पहिली बाब म्हणजे नेजल बोन अर्थात नाकाचे हाड, दुसरी बाब म्हणजे मानेच्या मागे असलेल्या पाण्याचा थर ज्यास न्युकल ट्रान्सलुसेन्सी म्हणतात व तिसरी बाब म्हणजे डक्टस व्हिनोसस या रक्तवाहिनीतील प्रवाह. यासोबत डबल मार्कर टेस्ट ही रक्तचाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. स्कॅन व रक्तचाचणी या दोन्ही गोष्टी मिळून बाळामध्ये कुठली क्रोमोजोमल अॅबनॉर्मिलिटी म्हणजे डाऊन्स, टर्नर्स सिन्ड्रोम आहे का, हे कळू शकते. शिवाय गर्भातील बाळाच्या विकासासंबंधीचे विकार, हृदयदोष, अनुवांशिक विकार हे देखील या स्कॅनद्वारे कळू शकतात. अॅन्टीस्कॅनसाठी गर्भाशयात बाळ विशिष्ट स्थितीत असायला हवे. ही स्थिती नैसर्गिकरीत्याच प्राप्त होत असते. बाळ त्या स्थितीत येत नाही, तोपर्यंत हे स्कॅन शक्य नसते. त्यामुळे या सोनोग्राफीला वेळही लागू शकतो. एकूणच स्कॅन किती लवकर होईल, हे बाळाच्या गर्भाशयातील स्थितीवर अवलंबून असते.