+919404395976
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
प्रेग्नेंसी आणि करोना करोनाचा विरोधात आपण एक विश्व युद्ध लढतोय. इतरांप्रमाणेच गर्भवती स्त्रियांना याचा धोका असतो. शासनानी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे प्रमाणे, वारंवार हात धुणे, मास्क वापरणे गर्दीपासून दूर राहणे किंवा सोशल डिस्टेंसिंग हीच इतरांप्रमाणे गर्भवतींना स्वतःची काळजी घ्यायची आहे. 1) गर्भवतींनी विशेष काळजी घ्यायची गरज असते का ? करोना मुळे गरोदर स्त्रियांना धोका आहे का किंवा बाळाला हानी होते का हा प्रश्न गर्भवती महिलांच्या मनात नेहमी असतो. करोना हा आजारच मुळी नवीन असल्यामुळे त्याच्यावर फारसा अभ्यास झालेला नाही. कोरोनाव्हायरस (कोविड -19 ) संसर्ग आणि गर्भधारणा - रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अॅन्ड गाईनाकोलॉजिस्ट द्वारा आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मार्गदर्शना प्रमाणे व आतापर्यंत आलेल्या रिपोर्टनुसार बाळावर व गरोदर माते वर वाईट परिणाम झालेला दिसले नाही. गर्भवतींमधे वर्टीकल ट्रान्समिशन किंवा नाळेतून बाळापर्यंत हा वायरस जात नाही. 2) गरोदर स्त्रियांना करोना आजार न होण्यासाठी काय करावे? गरोदर स्त्रियांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे शक्यतो करोना हा रोग होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी गरोदर स्त्रीने आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायाम व पुरेशी झोप गरजेचे आहे. आहारात पुरेशी प्रथिने, विटामिन व पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. गरोदर स्त्रियांनी व्यायाम वैद्यकीय सल्ल्याने व घरीच करणे महत्त्वाचे आहे. किंवा घरच्या घरी चालले सुद्धा उपयोगाचे होऊ शकते. मानसिक तान ताणतणाने सुद्धा इम्युनिटी कमी होऊ शकते त्यासाठी मानसिक स्वास्थ्य योग्य ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी मेडिटेशन यावरून योग्य पर्याय आहे. घाबरून न जाता स्वतःची काळजी घेऊन करोनाच्या विरोधात लढाईमध्ये विजय मिळवू शकतो. 3) सध्याच्या परिस्थितीत गरोदर स्त्रियांना गायनॅकॉलॉजिस्ट च्या रेग्युलर कन्सल्टेशन गरज आहे का ? तुमची प्रेग्नेंसी लो रिस्क असेल, म्हणजे ब्लड प्रेशर डायबिटिक IUGR, किंवा इतर मेडिकल प्रॉब्लेम नसतील तर घराबाहेर पडू नका. शासनाने लो रिस्क प्रेग्नेंसी साठी टेलिफोनिक कन्सल्टेशन करायची परवानगी दिली आहे. गरज असल्यास डॉक्टर तुम्हाला क्लिनिक किंवा दवाखान्यात बोलवतील किंवा पुढची अपॉइंटमेंट देतील अथवा टेलिफोनवर सल्ला देतील. जर डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली तर सोशल डिस्टसिंग पाळा, क्लिनिक मध्ये किंवा हॉस्पिटल मध्ये इतरांपासून अंतर ठेवा सोबत एकच नातेवाईक ठेवा व अँपोईन्टमेंट च्या वेळेतच हॉस्पिटलमध्ये पोहोचा मास्क व सॅनिटायझर सोबत ठेवा व वापर करा. हॉस्पिटलमधून घरी परत आल्यानंतर स्वच्छ आंघोळ करा व कपडे बदला किंवा किमान हात-पाय-तोंड स्वच्छ धुवा. गरज नसेल तर इलेक्टिव सर्जरी आणि इन्वेस्टीगेशन टाळा. इनफर्टिलिटी किंवा वांध्यात्वा चे सर्व उपचार पुढे ढकला. डॉ मिनाक्षी यलवंतगे Consultant Obstetrics & Gynaecology MBBS, MD (OB/GYN), MRCOG (London) Destination Women's Clinic Nanded city, Pune Call : 020-67523071 /: 9404612187