+919404395976
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
#Pregnancy_Tips :- डिलिव्हरी जवळ आली की नेमकी काय लक्षणं दिसतात व बाळ नेमकं कोणत्या वेळी योनीच्या दिशेने सरकू लागते याविषयी ब-याचदा महिलांना व्यवस्थित माहिती नसल्याने ऐन वेळेला गोंधळ उडतो. म्हणूनच जाणून घ्या सर्व माहिती. प्रसुती कळांच्या आधी बाळ बाहेर येण्यास पूर्णत: जेव्हा तयार होतं तेव्हा ते गर्भाशयातून खाली सरकून ओटीपोटाच्या म्हणजेच योनीच्या दिशेन येतं. जर ही परिस्तिथी एखाद्या स्त्रीला समजलीगरोदरपणात बाळ योग्य स्थितीमध्ये असणे गरजचे असते तेव्हाच त्या स्त्रीची डिलिव्हरी योग्य प्रकारे होऊ शकते. जस जसा डिलिव्हरीचा काळ जवळ येतो तस तशी बाळाची स्थिती बदलू लागते आणि बाळ योनी मार्गाच्या दिशेने सरकू लागते. अशावेळी डिलिव्हरी जवळ आली आहे असे समजावे. डॉक्टर ही स्थिती कोणत्या काळात येईल याचाच अनुमान लावून डिलिव्हरी डेट देतात. आपण आपण या लेखातून जाणून घेऊया की नेमक्या कोणत्या वेळी बाळ योनीच्या दिशेला सरकू लागते. हा संकेत जर स्त्रीला कळला तर आपली डिलिव्हरी जवळ आली आहे हे तिलाही कळू शकेल आणि ती अधिक सावध होऊ शकेल. चला तर जाणून घेऊया ही आगळीवेगळी माहिती जी प्रत्येक स्त्रीला माहित असणे गरजेचे आहे. बाळ साधारणपणे गरोदरपणाच्या 34 व्या किंवा 36 व्या आठवड्यात खाली सरकते. परंतु काही स्त्रियांमध्ये प्रसूती कळांची लक्षणे खूप आधी दिसू शकतात. खासकरून ज्या स्त्रिया पहिल्यांदा गरोदर असतात त्यांच्यात ही लक्षणे दिसतात. ह्या स्त्रिया आधीच गरोदर राहिलेल्या असतात त्यांच्या गर्भात बाळ खालच्या दिशेला सरकत नाही. जर असे वाटत असेल की बाळ खाली सरकले आहे तर एकदा डॉक्टरांशी अवश्य संपर्क साधावा. बाळाच्या स्थितीबाबत जाणून घ्यावे जेणेकरून प्रसूती दरम्यान कोणतीच समस्या होऊ नये. सामान्यत: गर्भात बाळाची स्थिती सतत बदलत असते. परंतु जन्माच्या काही काळ आधी पहिल्या गरोदरपणात बाळ खालच्या दिशेला सरकते. बाळ खाली येण्याआधी काही संकेत मिळू लागतात. जसे की स्त्रीला तिचे पोट अधिक जास्त लटकत असल्याचे दिसू लागते. हळूहळू बाळ खालील बाजूस सरकत असल्याने श्वास घेण्यात समस्या निर्माण होते. याशिवाय पोटात वेदना देखील वाढू शकतात. बाळ जस जसे अधिक खाली सरकू लागते तस तसा सर्विक्स वर दाब वाढू लागतो. यामुळे स्त्रीचे म्युकस प्लग सुटू लागते. जो की गुलाबी आणि जेली प्रकारचा स्त्राव असतो. हा म्युकस प्लग गर्भाशयामध्ये कोणत्याही विषाणूला गरोदरपणाच्या दरम्यान गर्भाशय ग्रीवा मध्ये घुसण्यापासून रोखतो. बाळ अधिकाधिक सरकू लागल्यावर व अपूर्ण सरकल्यावर काही लक्षणे दिसू लागतात. त्यापैकी महत्त्वाचे लक्षण म्हणजे वारंवार लघुशंका होते. प्रसूतीच्या वेळेस जेव्हा बाळाचे डोके हळूहळू योनीच्या दिशेने सरकू लागते स्त्रीला वारंवार लघुशंका होते. याशिवाय पाठीचे स्नायू सुद्धा मोठ्या वेदनेसह दुखू लागतात. बाळ खाली सरकताच पोटावरचा दबाव आणि छातीची जळजळ कमी होऊ लागते. याशिवाय अजून जास्त समस्या आणि वेदना होऊ लागल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधावा. उलट्या स्थितीत असणाऱ्या बाळाला सरळ कसे करावे? या स्थितीमध्ये गर्भाशयात बाळाचे डोके वरच्या बाजूस पाय खालील बाजूस अर्थात बर्थ कॅनॉलच्या दिशेने होतात. हि स्थिती उलटी स्थिती मानली जाते कारण सामान्यत: बाळ बाहेर येताना त्याचे डोके सर्वप्रथम बाहेर येते. या उलट्या स्थितीला वैद्यकीय भाषेत ब्रीच बर्थ सुद्धा म्हणतात. जर गरोदरपणात बाळ उलट स्थितीत जन्माला आले असेल तर बाळाची हि स्थिती सामान्य केली जाऊ शकते. मात्र हे प्रयत्न कितपत यशस्वी होतील हि गोष्ट ब्रीच प्रेग्नन्सीचे कारण काय आहे यावर अवलंबून असते. गर्भात बाळ उलट स्थितीमध्ये असल्यास जर स्त्री ऑपरेशन करू इच्छित नसेल तर एकदा तिने डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि जर डॉक्टरांनी नकार दिल्यास अजिबात नॉर्मल डिलिव्हरीचा हट्ट धरू नये.